जिल्हाधिकारी कार्यालयात लागली आग; नगररचना विभागाचे महत्त्वाचे रेकॉर्ड आगीच्या भक्षस्थानी

Foto

 औरंगाबाद:  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या नगर रचना विभागाला आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामन दलाच्या जवानांनी तासाभरात आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर नगररचना विभागाचे रेकॉर्ड रूम ऑफिस आहे.  या कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमला सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. 

 जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई चंद्रकांत भालेराव याला रेकॉर्ड रूममधून धूर येताना दिसला.  सदर कर्मचाऱ्याने लगेच कर्मचार्‍यांच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले छोट्या अग्निशमन यंत्राने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र,  धूर मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने आपत्ती निवारणाचे अधिकारी अजय चौधरी यांना माहिती देण्यात आली.  त्यांनी लगेचच अग्निशामन दलाचे शिवाजी सुरे यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली.  सकाळी दहाच्या सुमारास सुरे यांना फोन गेला अन् अवघ्या पंधरा मिनिटात दोन अग्निशमन दलाच्या गाड्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या.  नगररचना विभागाच्या रेकॉर्ड रूमला अवघे एकच दार आहे तर मागच्या बाजूने खिडक्या आहेत.  एका दारावाटे प्रचंड धूर येत असल्याने कुणालाही प्रवेश करता येत नव्हता.  शेवटी कर्मचाऱ्यांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडक्याची  काचे फोडून पाण्याचा फवारा सोडला.  मात्र,  तरीही धुराचे लोट निघतच होते.  अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर धूर काहीसा कमी झाला.  जवान रेकॉर्ड रूममध्ये शिरले.  नगररचना विभागाची रेकॉर्ड रूम अत्यंत असुरक्षित आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनाही आज शिरण्यास अडचण निर्माण होत होती.  याठिकाणी ठेवलेले रॅक इतके कोंदट आणि इतके दाटीवाटीचे आहेत की प्रत्येक रेकॉर्ड पर्यंत पोहोचण्यास एका व्यक्तीलाही अडचणीचे होते.  त्यामुळे जवानांना आत  शिरण्यास मोठी अडचण झाली.  महत्त्वाचे रेकॉर्ड नगररचना विभागाचे सर्व काम मनुष्यबळाने सुरू असते या विभागाचे संगणकीकरण अद्यापही झालेले नाही.  त्यामुळे संगणकावर केवळ वीस टक्केच काम सुरू असते.  सर्व कामे मनुष्यबळाने केली जातात.  त्यामुळे फाईलींची मोठे घटते आणि पीआर कार्ड नकाशा यासह महत्त्वाच्या नोंदी असलेले असलेल्या मोठ्या प्रमाणावर फाईल येथे पडून असतात.  नेमक्या रेकॉर्ड रूमला आग लागल्याने महत्त्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले.  तसेच अग्निशमन दलाने मारल्या पाण्यामुळे प्रचंड प्रमाणात फाईल भिजल्या आहेत.  शॉर्टसर्किटचा अंदाज सकाळी साडेनऊच्या सुमारास धुराचे लोट दिसल्यानंतर शिपाई रेकॉर्ड रूमकडे धावले अन बचाव कार्याला प्रारंभ झाला.  प्राथमिक अंदाजानुसार इलेक्ट्रिक शॉकसर्टी सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जाते.  मात्र, अग्निशमन दल विभाग तसेच नगररचना विभागाचे अधिकारीही आगीचे नेमके आणि स्पष्ट कारण सांगू शकले नाहीत.  शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

 रेकॉर्ड रूम मधल्या वायरी सुस्थितीत 
दरम्यान रेकॉर्ड रूम मध्ये अत्यंत सुरक्षित इलेक्ट्रिसिटी पोहोचल्या गेली आहे.  अत्यंत कमी पुरवठा या रेकॉर्ड रूम मध्ये होतो.   या खोलीतील वायर जळालेल्या नसल्याचे दिसून आले.  त्यामुळे शॉर्टसर्किट कसे असा प्रश्न उपस्थित होतो.  या खोलीच्या बाहेरच छोटी विद्युत डीपी बसवली आहे.  या डीपीला ही कोणत्याच धोका पोहोचलेला नाही.  त्यामुळे आग नेमकी कशाने लागली याचा खुलासा होत नव्हता. 

वर्षभरात दुसरी घटना
 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन नियोजन सभागृहाचे नूतनीकरण सुरू असताना गतवर्षी आग लागली होती.  त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बसवलेले अग्निशमन यंत्र मात्र अग्निशमन यंत्र सूचित असल्याने कर्मचार्‍यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले.  जिल्हाधिकारी कार्यालयात आगीची ही दुसरी घटना मोठी घटना वर्षभरात घडली आहे.  त्यामुळे इमारतीच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

 जिल्हाधिकारी मुंबईला 
जिल्हाधिकारी उदय चौधरी मुंबईला असल्याचे सूत्रांनी सांगितले.  मात्र,  आगीची माहिती त्यांना तातडीने देण्यात आली.  बचाव कार्याची माहिती अधीकारी त्यांना वेळोवेळी देत होते.  अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे  उपजिल्हाधिकारी निलेश रिंग यांनी तातडीने आगीची माहिती कळताच तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत मोर्चा सांभाळत  नगररचना विभागाचे अधिकारी सोनवणे मिटकर अश्पाक यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी मदत केली.  रेकॉर्ड रूम मधील सुरक्षित फायली कर्मचार्‍यांनी तातडीने इतरत्र हलवल्या.  कर्मचाऱ्यांच्या या प्रसंगावधानाने अनेक महत्त्वाचे रेकॉर्ड वाचले आहे. 

 महापौरांनी दिली भेट
 जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रूमला आग लागल्याची वार्ता वेगाने पसरताच महापौरांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.  महापौर नंदकुमार घोडेले यांनी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पाहणी केली.  तसेच अग्निशमन दलाच्या जवानांशी चर्चा केली. 

 रब्बानी यांचे प्रयत्न 
शिवसेनेचे अल्पसंख्यांक विभाग प्रमुख रब्बानी यांनी आगीची माहिती कळताच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.  अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेकॉर्ड रूम च्या खिडक्या फोडर अग्निशमन यंत्राद्वारे आग ठोकण्यात आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.  रब्बानी यांच्या कामाची उपस्थितांनी कौतुक केले.